। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलजवळील कामोठे बस थांब्याजवळ दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या. याप्रकरणी कळंबोली आणि कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कामोठे सेक्टर 35 मधील गृहस्थ नातेवाईकांना बस थांब्यावर सोडायला आले होते. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने पन्नास हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच, दुसऱ्या घटनेत कामोठे येथील 30 वर्षीय महिला प्रवासी तमिळनाडू ते कामोठे असा बस प्रवास करताना त्यांच्या प्रवासातील बॅगमधून 2 लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले आहेत. 40 ग्रॅम वजनाचे सोने चोरीस गेल्यामुळे या महिलेने ऑनलाइन तक्रार केली. त्यानंतर याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली.







