किरीट सोमय्या हल्ला प्रकरणात दोन पोलीस निलंबित

। पुणे । वृत्तसंस्था ।
पुणे महानगरपालिकेत गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच निलंबन करण्यात आलं आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या 2 कर्मच्यांचे निलंबन झाले असून, CISF च्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती.
भाजपनेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुणे महानगर पालिकेत येणार आहेत. पुण्यात दाखल होताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर देखील सोमय्या यांनी गंभीर आरोप केले. वाधवान प्रकरणातून ते सुटले मात्र आपल्याला जीवे मारण्याच्या प्रयत्नातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते आता सुटणार नाही असं म्हणत त्यांनी पुणे महानगरपालिकेत एवढे गुंड कसे घुसले, पोलीस आयुक्तांना ते दिसत नाहीत का? त्यांना अटक का झाली नाही? असे सवाल गुप्ता यांना उद्देशून केले.

Exit mobile version