। सांगली । प्रतिनिधी ।
सांगलीच्या जत तालुक्यातील सनमडी येथे तलावामध्ये बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.24) दुपारच्या सुमारास घडली. हर्षद संजय कांबळे (15) व जगदीश वसंत मोरे (14) अशी मृत मुलांची नावे आहेत. हर्षद याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती, तर जगदीश हा नववी इयत्तेत शिक्षण घेत होता. दोघेही आत्ये व मामेभाऊ होते. हर्षद याचे वडील संजय कांबळे यांचा मासेमारीचा व्यवसाय असून या तलावातील मासेमारीचा ठेका त्यांना मिळालेला होता. तलावावर मासेमारी सुरु असल्याने आत्येभाऊ जगदीशसोबत हर्षद साठवण तलावर गेला होता. यावेळी तोल जाऊन जगदीश हा तलावामध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी हर्षदने पाण्यात उडी घेतली, मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू
