| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील टेनिस क्रिकेटसाठी मोठी आशादायी घटना घडली आहे. हरियाणा येथे होणाऱ्या सहाव्या आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रायगड जिल्ह्यातील दोन खेळाडूंचा समावेश झाला आहे. रोहित भोमटे आणि प्रफुल्ल पारधी अशी या दोन खेळाडूंची नावे आहेत.
हरियाणा येथील पानीपत शहरामध्ये होणाऱ्या सहाव्या आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशन चषकासाठी महाराष्ट्र राज्याचा संघ जाहीर झाला आहे. ही स्पर्धा जूनमध्ये होत असून रोहित भोमटे आणि प्रफुल्ल पारधी या दोघांची रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडूंना रायगड टेनिस क्रिकेटकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे दोन्ही खेळाडू कर्जत तालुक्यातील माथेरान व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलचे खेळाडू आहेत.







