| मडगाव | प्रतिनिधी |
दीपावली सणातील गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर दोन वनवे स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. कारवार ते बंगळुरू तसेच बंगळुरू ते मडगाव या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत.
यासंदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कारवार ते सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरूदरम्यान गाडी (01686) ही वनवे स्पेशल गाडी दिनांक 3 नोव्हेंबर 2024 रोजी धावणार आहे. याचबरोबर सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळूर ते मडगाव दरम्यान धावणारी गाडी (01685) ही गाडी दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी धावणार आहे. या दोन्ही वनवे स्पेशल गाड्या वीस डब्यांच्या एलएचबी श्रेणीतील गाड्या असणार आहेत. दीपावली सणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.