| महाड | प्रतिनिधी |
महाड आगारातून सुटलेली महाड- सांदोशी आणि माणगाव वरून आलेली माणगाव किल्ले रायगड या दोन एस टी बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड आगारातून सुटलेली महाड सांदोशी आणि माणगाव वरून आलेली माणगाव किल्ले रायगड या दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक झाली आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची घटना घडली. रायगडाकडे जाणारा रस्ता अतिशय अवघड आणि नागमोडी वळणांचा आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी सांदोशी गावाजवळची ही घटना आहे. नागमोडी वळणांचा चालकांना अंदाज न आल्याने एसटीचा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. समोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात चालक अविनाश विंचोरकर आणि गणपत कदम, सीता कदम, गणेश जाधव, राजाराम लांबर, अपर्णा शेडगे, पूजा मांडे, स्मिथ मांडे, स्वप्नील उमराटकर, वृषाली मोरे, सुचिता धोत्रे हे प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत.







