। पनवेल । वार्ताहर।
सिडको अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत.
सिडको अग्निशमन विभागाची खारघर, उलवे, द्रोणागिरी, कळंबोली व नवीन पनवेल अशी पाच अग्निशमन केंद्रे कार्यान्वित असून, नागरिकांना 24 तास सेवा पुरवित आहेत. सिडको महामंडळाच्या परिक्षेत्रात उंच इमारती आहेत. त्याकरिता सिडको महामंडळाने हे वाहन व अरुंद ठिकाणी आग लागल्यास किंवा रस्ता अपघात झाल्यास विमोचनाकरिता अशी दोन वाहने सिडको महामंडळाने खरेदी केली असून 30 मेपासून या दोन्ही वाहनांचे लोकर्पण मुख्य दक्षता अधिकारी, यांच्या हस्ते करण्यात आले.