दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

| पुणे | वृत्तसंस्था |

शिरुर तालुक्यातील पाबळ येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

कडाक्याच्या उन्हामुळे आर्यन संतोष नवले (वय 13) आणि आयुष संतोष नवले (वय 10) हे दोघे भाऊ आपल्या आजोबांसोबत शेतातील शेततळ्यावर पोहायला गेले होते. यावेळी शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना तातडीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना पाबळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दोन भावांच्या मृत्यूमळे गावावर शोककळा पसरली आहे.

Exit mobile version