दोन टन प्लास्टिक पिशव्यां जप्त

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

प्लास्टिकमु्क्त नवी मुंबई शहर हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी शहरातील आठ ही विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक जनजागृती, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांच्या वापराची सवय नागरिकांना लागावी यादृष्टीने मार्केट्समध्ये कापडी पिशव्यांचे विनामुल्य वाटप असे उपक्रम राबविण्याबरोबरच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत.

अशाच प्रकारची प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्यांवरील धडक कारवाई करीत तुर्भेतून 2 टन 30 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला आहे. तसेच 50 हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल कऱण्यात आली. 10 दिवसांपूर्वीच तुर्भे विभागातूनच 1 टन 200 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. त्यानंतर त्याच विभागात ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.

या कारवाईमध्ये तुर्भे येथील मसाला मार्केट मधील विधी प्लास्टिकचे गोडाऊन, ग्रोमा सेंटरमधील गाला ब्रदर्स, जयेश कुमार, सिंघवी प्लास्टिक या व्यावसायिकांवर दुसर्‍यांदा प्रतिबंधात्मक प्लास्टिक वापराचा गुन्हा दाखल झाल्याने प्रत्येकी 10 हजार रु इतकी दंडात्मक रक्कम वसूल कऱण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्यांचा साठाही जप्त करण्यात आला व त्यांस समज देण्यात आली.

Exit mobile version