| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड समुद्रकिनार्यावर रविवारी सकाळी ग्रीन टर्टल प्रजातीचे दोन मोठे कासव किनार्यावर फुगलेल्या अवस्थेत आढळली. त्यातील एक विश्राम बागेसमोर,तर दुसरे कासव काही अंतरावर समुद्रकिनार्यावर कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मुरुडच्या समुद्रकिनार्यावर सतत कासव मृतावस्थेत सापडणे ही बाब चिंतेची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत पाटील यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
मुरुड समुद्रकिनारी दोन कासव मृतावस्थेत
