| पनवेल | वार्ताहर |
तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन अनोळखी इसमांचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध पोलीस करीत आहेत. तळोजा फेज 1 गार्डन जवळ ठिकाणी वय वर्षे 35 ते 40 असून कुठल्यातरी शारीरिक आजाराने पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला, त्यानुसार सदर बेवारस व्यक्तीला पनवेल उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले आहे. काळा सावळा रंग व अंगावर कपडे नाहीत, साडेपाच फूट, केस बारीक काळे, अंगाने सडपातळ असा अनोळखी इसम आहे. तसेच तळोजा मजकूर येथे 60 ते 65 वर्षे वयोगटातील पुरुष व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेला त्यास उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. सदर व्यक्तीची उंची साडेपाच फूट आहे, केस पांढरे, नाक सरळ व चेहरा लांबट व रंग काळा सावळा, अंगात ग्रे कलरचा मळकटलेला लांबट शर्ट, कमरेस काळ्या रंगाचा बरमुडा, दाढी वाढलेली आहे, अनोळखी व्यक्ती आहे. वरील दोघेही इसम बेवारस असून त्यांची फोटो, माहिती तळोजा पोलीस ठाणे येथे उपलब्ध आहे. कुणाचे जवळचे व्यक्ती गायब असेल तर त्यांनी तळोजा पोलीस ठाणे येथे क्रमांक- 022-27412333 संपर्क साधण्याचे आवाहन तळोजा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक बी.जी. खाटपे यांनी केले आहे.