नेरळ पेट्रोल पंप येथे दोन वाहनांचा अपघात

| नेरळ | प्रतिनिधी |

कल्याण कर्जत राज्य मार्ग रस्त्याला भेदून नेरळ माथेरान मिनीट्रेन जात असते. त्या ठिकाणी दुपदरी रस्ता अरुंद होतो आणि त्यामुळे तेथे सातत्याने अपघात होतात. आज दुपारी नेरळमधून कर्जतकडे जाणार्‍या एर्टिगा गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नांत टेम्पो एर्टिगा गाडीला जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कोणालाही लागले नसल्याने या भागातील रास्ता रुंद करण्याची मागणी वाहनचालक यांच्याकडून सुरु आहे.

कल्याण कर्जत रस्त्यावर नेरळ पेट्रोल पंप येथे नेरळ येथून माथेरानकडे जाणारी मिनीट्रेन रस्त्याच्यामधून जात असते. हा रस्ता अस्तित्वात येण्याआधी 115 वर्षांपूर्वी नेरळ माथेरान मिनीट्रेनचा मार्ग आहे. मागील काही वर्षांपूर्वी कल्याण कर्जत राज्यमार्ग दुपदरी बनविला गेला. मात्र, रेल्वे प्रशासनाची जमीन असल्याने त्या ठिकाणी हा रस्ता अरुंद बनला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वेगाने येणारी वाहने यांना त्या ठिकाणी अपघात होत होते. त्या भागात मागील दहा वर्षे 100 हुन अधिक अपघात झाले आहेत. त्यामुळे वाहनचालक यांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला मिनीट्रेन मार्ग लक्षात घेऊन गतिरोधक बनविले आहेत. मात्र तरीदेखील आज 2 एप्रिल रोजी नेरळकडून कर्जत येथे जाणार्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोने धडक दिली.

कल्याण रस्त्याने कर्जतकडे जाणारी एम एच 46- बी झेड 3243 हि एर्टिगा गाडी गतिरोधकी ओलांडून रेल्वे मार्ग ओलांडून जात असताना मागाहून कर्जतकडे जाणारा टेम्पो एम एच 04,एच एस 1002 या गाडीने नव्याने बसविलेल्या गतिरोधकवरून वेगाने गाडी नेली आणि पुढे जाणार्‍या एर्टिगा गाडीला जोरदार धडक दिली. त्या अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून रस्त्याच्या अरुंद होण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती नेरळ पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version