नागोठणेनजीक टँकरच्या धडकेने दोन वाहने पेटली

महामार्गावर वाहतूक कोंडी
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
महामार्गावर नागोठणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोलेटी गावाच्या नजीक रात्री च्या सुमारास टँकर वेगवान चालविल्याने पलटी झाला. यावेळी टँकर रस्त्यावर घेताना टँकर ची धड़क बसून मुंबईच्या दिशेने जाणारी दोन प्रवाशी कार (वाहने)यांनी पेट घेतला. याठिकाणी मुंबई गोवा महामार्ग एकेरी असल्याने वाहनांची लांबच लांब रांग लागली. या अपघाती घटनेनंतर तासनतास वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल पाच तास या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. दोन जळीत वाहनातील प्रवासी सुुदैवाने बचावले, मात्र वाहने आगीत जळून खाक झालीत. अपघातातील टँकर ( एम एच 04 केयु 5739) वडखळ बाजुकडून येत होता.वाहनचालकाच्या बेपर्वाईने टँकर रस्ता सोडून खाली गेला होता. तो रोडवर घेण्याचा प्रयत्न करीत असताना टॅन्कर उजव्या कुशीवर पलटी होऊन रोडवर घासत जावुन इर्टिका कार (एम एच 08 ए.एन 5349) व हुन्डाई अल्काझर कार (एम एच 46 बी झेड 4236 )यांना ठोकर लागून अपघात झाला. सदर अपघातात दोन्ही कार ला आग लागुन त्या पुर्ण पणे जळुन नुकसान झाले. तसेच टॅन्करचे नुकसान होवुन त्यामध्ये असलेले केमिकल रस्त्यावर सांडुन नुकसान झाले. अपघातात दर्याकुवर खिमसिंह राजपुत यांना किरकोळ दुखापत झाली असून,टँकरचालक अपघातानंतर फरारी झाला. नागोठणेे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version