। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हिरानंदानी फॉर्च्युन सिटी फ्लोरा बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बेदरकार वाहनचालकामुळे अपघात घडला. संबंधित व्यक्ती चालक नसतानाही पार्किंगमध्ये उभी असलेली मारुती स्विफ्ट डिझायर (क्र. एपी 28 डीएम 1888) ही गाडी सुरू करून रिव्हर्स घेत असताना मागे उभी असलेल्या टोयोटा इनोव्हा (क्र. एचपी 14 सी 4601) या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास म.पो.ह. पाटील करीत आहेत.
बेदरकार वाहनचालकामुळे दोन वाहनांचे नुकसान
