ट्रेलरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल–मुंब्रा महामार्गावरील तळोजा येथील पेंधर उड्डाणपुलाखाली दुचाकी घसरून पडलेल्या दुचाकीस्वाराच्या अंगावरून भरधाव ट्रेलर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी घडली. दिनेश शिंदे (42) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून, ते पनवेल येथील आदई गावात राहत होते.

दिनेश शिंदे हे दुचाकीने तळोजा येथून पनवेलकडे जात होते. पनवेल–मुंब्रा महामार्गावरील पेंधर उड्डाणपुलाखाली आल्यानंतर त्यांच्या मोटारसायकलचा अचानक ताबा सुटून ती घसरली. त्यामुळे ते रस्त्यावर कोसळले. याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रेलरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version