| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यात एकामागून एक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. मागील 12 दिवसांपूर्वी कणघर येथे वृद्ध महिलेचा अंगावरील दागिने चोरण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी गळा दाबून खून केल्याची आणि दुसऱ्या घटनेत म्हसळा शहरात वृद्ध आजोबाची नातवाने तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना ताजी असतानाच तोराडी आदिवासीवाडी येथील 76 वर्षाची वृद्ध महिला तर लेप गावातून विवाहित महिला तिच्या लहान मुली सोबत बेपत्ता असल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. या घटनेची म्हसळा पोलिसांनी माहिती दिली असता निर्मला महादेव पवार ही 76 वर्षाची वृद्ध महिला अंगाने सडपातळ व उंच असुन रंग गोरा,अंगावर पांढऱ्या रंगाची साडी नेसून मौजे तोराडी आदिवासीवाडी येथून दिनांक 29 जुलै पासुन बेपत्ता झाली आहे. तर दुसऱ्या घटनेत विवाहित महिला प्रिया प्रसाद तांबडे (28) रंग गोरा अंगाने सडपातळ उंची 5 फूट तिची मुलगी कुमारी वेदा तांबडे (8) रंग गोरा अंगाने सडपातळ उंची 3 फूट या मायलेकी 9 जून 2025 पासून त्यांच्या लेप येथील घरातून बेपत्ता असल्याची तक्रार प्रियाचा पती प्रसाद तांबडे (28) याने म्हसळा पोलीस ठाण्यात दिली आहे. वरील वर्णन केलेल्या बेपत्ता वृद्ध महिला, विवाहित महिला व मुलगी कोणाला दिसून आल्यास म्हसळा पोलीस ठाण्यात 02149232240 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







