एक जण गंभीर
। नेरळ । प्रतिनिधी ।
पुणे-मुंबई महार्गावर दुचाकी टेम्पोवर धडकून अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि. 18) रात्री 11.30 च्या सुमारास झाला असून अपघातातील तिन्ही तरुण अल्पवयीन होते.
खोपोलीजवळील साजगाव येथील यात्रेसाठी माथेरानमधील सहा तरुण सोमवारी सायंकाळी गेले होते. यात्रेत साधारण अकरा वाजेपर्यंत मौजमजा केल्यानंतर हे तरुण पुन्हा माथेरान येथे जाण्यासाठी निघाले. सहा जणांपैकी दर्शन वेताळ, अजय आखाडे, प्रथमेश सोनावणे हे तिघे एकाच दुचाकीवरून जात होते. दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गावरून येत असताना त्यांची दुचाकी दर्ग्याजवळ एका टेम्पोवर जाऊन धडकली. यात दुचाकीवरील तीनही तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पनवेल येथील एम.जी.एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी दर्शन वेताळ आणि अजय आखाडे या दोन तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रथमेश सोनावणे याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
अपघात ग्रस्त तिन्ही तरुण हे अल्पवयीन होते आणि अल्पवयीन असल्याने त्यांच्याकडे वाहतूक परवानादेखील नव्हता. मात्र, या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.