। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
दापोली तालुक्यातील सडवे येथील नदीवर सोमवारी (दि.4) सायंकाळच्या सुमारास दोन युवक मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सुजीत सुभाष घाणेकर (25) आणि आयुष अनिल चिनकटे (21) असे या मृतांचे नाव आहे. हे दोघे सायंकाळी साडेचारच्या सुमारास गंभीर डोह येथे मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले. पाणी खोल असल्याने ते दोघे बुडाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी ग्रामस्थांनी या दोघांचा शोध घेतल्यानंतर त्यांचे मृतदेह सापडले. अधिक तपास दापोली पोलीस करित आहेत. या घटनेमुळे सडवे गावावर शोककळा पसरली आहे.