उरणमध्ये उडान महोत्सव जल्लोषात

| उरण | वार्ताहर |

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय तसेच यूईएस महाविद्यालय, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केला जाणारा उडान महोत्सव युइएस महाविद्यालयात जल्लोषात संपन्न झाला. विद्यापीठाच्या डीएलएलई विभागाचे प्रा.डॉ. बळीराम एन.गायकवाड, डॉ. सुनील पाटील, डॉ.कुणाल जाधव, शिरीष पुजारी, प्रदीपचंद्र शृंगारपुरे, तनसुख जैन, मिलिंद पाडगावकर, चंद्रकांत ठाकूर, प्राचार्य प्रा.किशोर शामा, प्राचार्या मीनाक्षी गुप्ता, रमेश ठाकूर, प्रा.डॉ. बी. एस.पाटील व प्रा. मनीष धायगुडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सव समन्वयक प्रा.व्हि एस इंदुलकर यांनी केले.

या महोत्सवात एकूण नवी मुंबई परिसरातील 22 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला त्यात एकूण 420 स्पर्धक विद्यार्थी, 50 स्वयंसेवक व 60 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. या महोत्सवात पथनाट्य, पोस्टर मेकिंग, क्रिएटिव्ह लेखन, वक्तृत्व व पोवाडा या विविध पाच स्पर्धांचे आयोजन केले गेले. उरण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य स्पर्धा प्रथम, पोस्टर मेकिंग स्पर्धा प्रथम, पोवाडा स्पर्धा उत्तेजनार्थ व वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली तर विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरव करण्यात आला.

Exit mobile version