। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील प्रतिष्ठित साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लबचे आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू उदय चौटा यांचे ब्रेन हॅमॅरेजने शनिवार, दि. 21 मे रोजी पहाटेच्या सुमारास अकाली निधन झाले. निधनसमयी ते अवघ्या 43 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी परिणिता, मुलगा निशान व मुलगी निर्वी असा परिवार आहे. ते खेळाडू म्हणून मेंगरुल येथील बँक ऑफ बडोदा येथे कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कबड्डी वर्तुळात शोककळा पसरली आहे.