| सुधागड-पाली | वार्ताहर |
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रायगड जिल्हा दौरा आटोपून परतीला निघाले असताना शुक्रवारी (दि. 2) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास त्यांचे पालीत आगमन झाले. त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी उपस्थित हजारो शिवसैनिक व नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक जिंकल्यावर नक्की बल्लाळेश्वर व कुलदेवता कोंडजाई देवीच्या दर्शनाला येणार. तसेच मी पुन्हा इकडे यावेसे वाटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त खासदार व आमदार निवडून द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत, महिला जिल्हा संघटका दिपश्री पोटफोडे, सुधागड तालुका संघटिका सुरावकर, नांदगाव महिला विभाग प्रमुख नेत्रा पालांडे, शिशिर धारकर, तालुका प्रमुख दिनेश चिले, तालुका संपर्कप्रमुख विनेश सितापराव, उपतालुकाप्रमुख किशोर दिघे, रमेश सुतार, शहरप्रमुख ओमकार खोडागळे, पेण विधानसभा युवासेना अधिकारी किरण पिंपळे, सचिन ढोबळे, किशोर खरीवले, विदेश आचार्य, प्रशांत शितोळे, पाली शहर युवा अधिकारी यश हजारे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.