खोपोलीत उद्या उध्दव ठाकरे यांची सभा

| खोपोली | प्रतिनिधी |

शिवसेना उध्दव ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपने माजवलेल्या आराजकता विरोधात लढत आहेत. महाराष्ट्रात दौरे करीत असतानाच ( दि.4 ) मार्च रोजी खोपोलीत जाहीर सभा घेत आहेत. या सभेला कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसैनिक आणि सर्वसामान्य मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे सभेच्या ठिकाणी पाहणी करताना व्यक्त केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा खोपोलीत ( दि.4 ) मार्च सायंकाळी 5.30 वाजता संपन्न होणार आहे. शनिवारी मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे हे खोपोलीत सभेची तयारी पाहणी करीत सभेच्या नियोजनाचे मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना केले. याप्रसंगी खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, खोपोली प्रभारी शहरप्रमुख संतोष देशमुख, संघटक दिलीप पुरी, युवासेना अधिकारी पंकज रूपवते, प्रवक्ते विलास चालके, महिला पदाधिकारी सुविधा विचारे, युवानेता स्वप्निल सुर्वे, मनीष पालांडे, तुलसीराम पाटील, संतोष अण्णा वाघेरे, जय खेडकर, प्रतीक शिंदे, पंकज जाधव, संकेत सोरडे, संजय मोरे, ऋषिकेश मनोरे, कुणाल साखरे, राजू पोटे, बापू वझरकर आदि उपस्थित होते. जाहीर सभेच्या आयोजनासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख, महिला आघाडी, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक युवा सैनिक प्रचंड मेहनत घेत असल्याबद्दल सर्वांचे कौतुक संजोग वाघेरे यांनी केले.

Exit mobile version