| पनवेल | वार्ताहर |
विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या कार्याची दखल प्रशिक एज्युकेशन सोसायटीने दखल घेऊन यंदाचा धीरूभाई अंबानी स्मृती ‘उद्योगरत्न’ गौरव पुरस्कार महेश राघो पाटील यांना राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आला. प्रशिक एज्युकेशन सोसायटी देवीचा पाडा नावडा पनवेल येथील आयोजित कार्यकमात अनेक मान्यवरांना विविध समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सचिव अरुण जाधव, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे, पनवेल येथील मनोज कांबळे, भरत दातार, मुंबई चेंबूर येथील सुमित हिरवे, रमेश रुपवते हे त्यावेळी उपस्थित होते.