| उरण | प्रतिनिधी |
यु.ई.एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स, कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीमध्ये गुरुवारी (दि.19)रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळ विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेतजमले होते. याप्रसंगी सिनियर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका, समन्वयक, पीटीए सदस्य, पालकगण, शिक्षक व स्कूल, ज्युनिअर व सिनियर कॉलेजचे सर्व विदयार्थी उपस्थित होते. यानंतर ढोलताशे व लेझिमच्या लयबद्ध वाद्यवृंदासह महाराजांच्या पालखीची मिरवणूक निघाली. सर्व विदयार्थ्यांनी पारंपारिक वेष परिधान केला होता. त्यातील काही विदयार्थी जिजाऊ व बाल शिवाजींच्या वेशभूषेत आले होते. ह्या सर्व विद्यार्थ्यांनी पालखीतील शिवरायांच्या मूर्तीची वाजत गाजत भव्य मिरवणूक पालक मैदानाच्या दिशेने काढली. सर्व कार्यक्रमाची तयारी, उपस्थितांचे स्वागत, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन युईएस परिवारातील शिक्षकांनी सुत्रबध्द पध्दतीने केले.
युईएसतर्फे लेझिम नृत्य सादर
