| मेलबर्न | वृत्तसंस्था |
रशियाने युक्रेनवर आक्रमण करत त्यांच्या अनेक शहरांवर बॉम्बचा वर्षाव केला होता. रशियाच्या या बॉम्बवर्षावात युक्रेनच खारकीव्ह हे शहर पूर्णपणे बेचिराख झाले आहे. याच शहरात युक्रेनच्या पॅरोलिंम्पिकपटू लियुदमयला लियाशेन्कूचे घर होते. ते काही दिवसांपूर्वीच रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात उद्धवस्त झाले. मात्र डोक्यावरचे छप्पर हिरावल्या गेलेल्या या दिव्यांग खेळाडूंने आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकून दिले. लियाशेन्कूने बिजिंग विंटर ऑलिम्पिकमध्ये बायथ्लॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले.
युक्रेनच्या 28 वर्षाच्या या . लियाशेन्कूने आपले हे सुवर्णपदक युक्रेनच्या लष्कराला आणि आपल्या कुटुंबियांना समर्पित केले. ती म्हणाली ममी हे सुवर्णपदक युक्रेनच्या नागरिकांना, आमचे संरक्षण करणार्या लष्कराला माझ्या कुटुंबियांना समर्पित करत आहे. लियाशेन्कूने सुवर्णपदक जिंकून युक्रेनची सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साजरी केली. ओलेक्झांडर काझिक आणि ओकसाना शायश्कोव्हा यांनी देखील युक्रेनसाठी सुवर्णपदक जिंकले होते. शायश्कोव्हाने तर युक्रेनसाठी बिजिंग विंटर पॅरोलिंम्पिकमध्ये तब्बल 5 पदके पटकावली आहेत. यात तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. तिने बायथ्लॉन, क्रॉस कंट्री आणि स्किईंगमध्ये ही कामगिरी केली आहे.
युक्रेनच्या खेळाडूने जिंकले सुवर्ण
