उल्हास नदी गाळ, कचरामुक्त करा; निर्मलजल अभियानाची मागणी

। नेरळ । प्रतिनिधी ।
बारा महिने वाहणारी कर्जत शहरातील उल्हास नदी प्रदूषणामुळे बंदिस्त स्वरूपात झाली आहे. या नदीच्या पाण्यात कचरा गाळ यामुळे नदीला विद्रुप स्वरूप आले आहे. उल्हास नदी निर्मल जल अभियानाचे कार्यकर्ते यांनी उल्हास नदी प्रदूषण विरहित करण्यात मागणी केली आहे.

कर्जतच्या इतिहासात प्रथमच गेल्या वर्षीच्या पुरामध्ये श्रीराम पुलाकडून चारफाट्याला जाणार्‍या रस्त्याला समांतर असलेल्या नदीपात्रातुन महापुराची पाणी अनेक भागात रस्त्यावर आले होते.परिणामी कोतवाल नगर, मुद्रे, रेव्हेन्यू वसाहत, अभिनव ज्ञान मंदिर शाळेचा परिसर, आमराई, आणि कर्जत नगरपालिका हद्दीच्या इतर भागात राहणार्‍या नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. तर जीवावर बेतण्याच्या घटनेतून अनेक जण बचावले होते.श्रीराम पुलाच्या परिसरातील उल्हास नदीपात्राकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. यासाठी बर्‍याच वर्षांपासून साचलेला गाळ आणि जमा झालेला कचरा आणि तेथे वाढत असलेल्या झुडुपांनी धरून ठेवलेल्या मातीमुळे नदीपात्राची पातळी ही उथळ झाली आहे.

उल्हास नदीपात्रात ठिकठिकाणी झालेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे पुढील प्रत्येक पावसाळ्यांमध्ये अशीच परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी उल्हास नदीपात्रातील गाळ कचरा काढणे यासारख्या उपाययोजना कराव्यात, प्रत्यक्ष नदीपात्रात असलेला गाळ वाढलेली झुडूपे काढून नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत व्हावा, यासाठी योग्य ती पावले वेळीच उचलावीत अशी मागणी करणारे निवेदन उल्हास नदी निर्मल जल अभियानाच्या वतीने कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले आहे. अभियानाचे कार्यकर्ते समितीत सोहनी यांच्याकडून हे पत्र देण्यात आले आहे.

पूर निवारण समस्या
उल्हास नदी निर्मल जल अभियान यांनी केलेल्या पूर समस्या निवारण या विषयी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मागील आठवड्यात शनी मंदिर येथे कर्जतमधील 15 नागरिकांनी हजेरी लावली या समस्येवर वर तोडगा काढायचा असेल तर सर्व कर्जतकरांनी संपूर्ण ताकदीने यात उतरायला हवे. त्या साठी उल्हास नदी निर्मल जल अभियान पूर समस्या निवारण परिषदेचे सदस्य* कर्जतमध्ये पूरग्रस्त भागातील नागरिकांची भेट घेणार आहेत. सद्यस्थिती मध्ये कर्जतमध्ये आगामी पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

Exit mobile version