| उरण | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला लागून उलवे शहर आहे. या उलवेमध्ये विनापरवाना, अनधिकृत मटण-चिकनची दुकाने तेजीत असून, या उघड्यावरील दुकानांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. या बेकायदा दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी उलवे शहर नियोजन समितीचे संतोष काटे यांनी केली आहे. या मागणीच्या अंमलबजावणीसाठी नवरात्रौत्सव मधील नऊ दिवस ते अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. दि.22 ते 30 सप्टेंबर दरम्यान उलवे शहर नियोजन समिती द्वारे अन्नत्याग उपोषणाचे आयोजन करण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात विमानतळच्या बिंदूपासून 10 किलोमीटर परीघात प्राण्यांची कत्तली करणे, त्याची कातडी वा अवशेष टाकणे, कचरा व इतर प्राणघातक पदार्थ टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण अनेक पशूपक्षी हे मांस, पदार्थ खातात, आजूबाजूच्या परिसरात अन्न शोधण्यासाठी येतात व विमान उडत असताना या पक्ष्यांचा विमानाला अपघात होतो व आगी लागणे किंवा इतर तांत्रिक बिघाड विमानात होतात.
उलवे शहर नियोजन समितीचे उपोषण
