उमेर कादिरीने उंचावले भारताचे नाव

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा येथील एच. पी. गॅस कंपनी आणि एच. पी. पेट्रोल पंपाचे मालक सईद अहमद जहीर कादिरी यांचा मुलगा उमेर कादिरी याने अमेरिकेतील नामवंत आणि सर्वोच्च युनिव्हर्सिटी थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ सायन्स इन कन्स्ट्रॅकशन मॅनेजमेंट डिग्री उच्च श्रेणीमध्ये संपादन करून अमेरिकेमध्ये भारताचे नाव उज्वल केले आहे.

उमेरचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण म्हसळा येथील आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा येथे झाले आहे. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊन देशाचे नाव उंचावणे हि त्याची लहानपणापासूनची इच्छा होती. उमेर वडिलांसारखाच शांत आणि संयमी असून त्याची चांगल्या करिअरकडे वाटचाल सुरु आहे. अमेरिकेत कोणीही जवळचा नातलग नसतानाही शर्थ, जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर एवढं मोठ यश मिळविल्याबद्दल उमेर याचे केवळ म्हसळ्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून फोनद्वारे त्याच्या वडिलांचे अभिनंदन होत आहे.

Exit mobile version