मोरी करण्यासाठी उसरोलीकर रस्त्यावर

तहसीलदारांना निवेदन सादर

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील उसरोली-आदाड मुख्य रस्त्यावरील आदाड गावाच्या प्रवेशद्वारावर गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली काँक्रीट मोरी पुर्ववत खुली करून पाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा. या मागणीसाठी आगरी समाज व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. मुख्य रस्त्यावरील मोरी पूर्ववत खुली करून न दिल्यास आंदोलन करण्याचा यावेळी इशारा देण्यात आला.

तहसीलदार रोहन शिंदे, पोलिस निरीक्षक प्रकाश सकपाळ, रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अरुण पाटील, उसरोली ग्रामपंचायत सरपंच मनिष नांदगावकर, आगरी समाज अध्यक्ष गोविंद भोईर, सचीव अविनाश शिंदे, सहसचिव तुषार रोटकर, गांवपाटील तुकाराम नवघरकर, पंच विनोद नवघरकर, शैलेश गुंड, प्रकाश शिंदे, सुरेश गुंड, मोतीराम म्हात्रे, ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुरुड सुपेगाव रोहा रस्त्यावर आदाड फाट्यावर स्त्यावरील मोरी बुजवली गेली आहे. पावसाळ्यात पाणी अडल्याने मोठी समस्या निर्माण होते. मुख्य रस्त्यावरील आदाड गावामध्ये प्रवेश करताना त्याठिकाणी असलेली मोरी दोन वर्षांपासून बंद झालेली आहे. यामुळे पावसाळी आजुबाजुच्या परिसरा मधील सर्व पाणी हा मुख्य रस्त्यावर येवून गावा-गावांमध्ये देखील शिरते. यामध्ये खराब देखील प्रवाह आमच्या गावामध्ये येतो व काही ठिकाणी हा खराब पाणी साचून राहतो व त्या खराब पाण्यामुळे किटनाशके, डासांची पैदास होवून आम्हां गावकर्‍यांना आजारपणाला सामोरे जावे लागते. या बंद मोरीमुळे प्रचंड त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. सदर मोरी बुजवली गेल्याने पावसाळ्यात निर्माण होणार्‍या समस्यांचा पाढा ग्रामस्थांनी पोलिस, महसुल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसमोर वाचला.

यावेळी प्रकाश गुंड, विजय म्हात्रे, संगीता गुंड, ऋषाली नवघरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याबाबत तहसीलदार रोहन शिंदे यांना ग्रामस्थांतर्फे एक निवेदन देण्यात येऊन या मोरीचे बांधकाम न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग रोहा यांच्यातर्फे करण्यात येत मुरुड- सुपेगाव-रोहा रस्त्यावर योजनेत आदाड फाट्यावरील मोरीचे बांधकाम करण्यात येणार आहे. पावसाळ्यात रस्त्यावर दोन फूट पाणी असते. यासाठी या ठिकाणी रस्त्याची उंची रुंदी वाढवून साईड पट्ट्या करण्यात वरीष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

अरुण पाटील, शाखा अभियंता
Exit mobile version