| पनवेल | वार्ताहर |
तळोजा फेज दोन वसाहत येथील सिडकोच्या भूखंडांवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेले पाच अनधिकृत धाबे सिडकोकडून जमीनदोस्त करण्यात आले आहेत. तळोजा फेज दोन वसाहतीत सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीलगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. तळोजा वसाहतीलगत असलेल्या मुख्य रस्त्यावर हॉटेल बागबान, शालिमार, पटेल, संसार व स्टार प्लॅनेट आदी धाबे विटा, पत्रे टाकून अनधिकृत उभारण्यात आले होते. याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ही सर्व बांधकामे जमीनदोस्त केली. दरम्यान, सिडकोची कारवाई होणार असल्याची माहिती मिळताच तळोजा फेज एक आणि दोनमधील फेरीवाल्यांनी दुकाने ने बंद ठेवली होती. तर येथील अनधिकृत ग दुकानांवर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.