वनविभागाच्या जागेवर अनधिकृत मजार

रसायनीकरांचा उग्र आंदोलनाचा इशारा

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी जुनी पोसरी येथील वन विभागाच्या जागेवर झालेल्या अनधिकृत मजार बांधकाम अतिक्रमणावर कारवाई करण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा रसायनीतील पोसरी, सावळे, देवळोली ग्रामपंचायत, बजरंग दल तसेच परिसरातील आसपासच्या ग्रामपंचायतींनी वनविभागाला दिला आहे. दरम्यान, रसायनीकरांत याप्रकरणी संतापाची लाट उसळल्याचे चित्र पहावयास आहे. या अनधिकृत बांधकामाकडे वनविभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

याबाबत स्थानिक ग्रामपंचायतींनी पत्रव्यवहार केला; परंतु वनविभाग जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याने बजरंग दलाने ही पाठिंबा देत विषय हाताळला आहे. यासाठी बजरंग दलाच्या शिष्टमंडळाने जुनी पोसरी येथील बांधकाम न तोडल्यास वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर हिंदू संघटनाही आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. याअगोदर बजरंग दलाच्या शिष्टमंडळाला सदर बांधकाम तोडण्यात येणार असल्याचा शब्द वनविभागाचे पनवेल आरएफओ यांनी दिला असतानाही टाईमपास केला जात आहे. याबाबत बजरंग दलाने पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री, गृहमंत्री, वनमंत्री, तहसीलदार, वनविभाग अलिबाग, ठाणे, पनवेलसह स्थानिक पोलीस यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

Exit mobile version