खोपटे पुलावर अनधिकृत ट्रेलर पार्किंग; वाहतुकीस अडथळा

| उरण | वार्ताहर |
रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवत असताना आता खोपटा बांधपाडा हद्दीत असणार्‍या मास्टर मरीन यार्डसुद्धा वाहतूक कोंडीस कमी पडत नसल्याचे खोपटा पुलावर पार्किंग करून ठेवलेल्या कंटेनरच्या लांबच लांब रांगेवरून दिसून येत आहे. खोपटा पुलाजवळ मरीन हे एमटी कंटेनर साठवणूक करून ठेवणारे यार्ड आहे. या यार्डमध्ये सध्या रिफर कंटेनर ठेवले जात आहेत. यार्ड मालक यार्डमध्ये जागा नसतानाही कंटेनर मागविले जात आहे. कंटेनर यार्डमध्ये कंटेनर ट्रेलर पार्किंगला जागा नसल्यामुळे कंटेनर ट्रेलर हे रस्त्यावरच उभे केले जात असून, त्यांच्या रांगा खोपटा पुलापर्यंत पोहचल्या आहेत.त्यामुळे वाहतूकीला मोठा निर्माण होत आहे. या पार्किंगमुळे अनेक समस्याही उद्भव आहेत.

उरण तालुक्यात असे अनेक कंटेनर यार्ड आणि गोदामे आहेत. त्यांच्याकडे वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे हे कंटेनर चालक बेकायदेशीरपणे ही वाहने रस्त्यावर उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. मात्र, या संबंधित असणारी यंत्रणा याकडे डोळेझाकपणा करीत असल्याने अनेक समस्या वाहतूक कोंडी होते आणि या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना निष्पाप दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याच्या अनेक घटना होऊन त्यामध्ये अनेकांचे बळीही गेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर आणि कंटेनर यार्ड मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड संपर्क केला असता होऊ शकला नाही.

Exit mobile version