सुधागड-पाली | वार्ताहर |
पालीतील ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये इयत्ता सातवीत शिकणार्या अल्पवयीन मुलीचा शाळेतील जेष्ठ शिक्षकाने पेपर चालू असतांनाच सोमवारी (ता.29) विनयभंग केला आहे. याआधी देखील या शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मंगळवारी (ता.30) सायंकाळी या शिक्षकावर पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की या मुलीचा गणित विषयाचा पेपर चालू असतांना गुलाब एकनाथ पाटील (वय.57) या ज्येष्ठ शिक्षकाने तिचा विनयभंग केला. या आधी देखील त्याने असा प्रकार केला असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी या शिक्षका विरोधात पाली पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार पाली पोलीस ठाणे कॉ. गुन्हा रजिस्टर नंबर 120/2021 भा. द. वि. सं. कलम 354 (अ)(1) सह लैंगिक अपराधां पासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 9 (एफ)(एम), 10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे या करीत आहेत.