| कर्जत | प्रतिनिधी |
सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात व्यवसायिक माहिती सहज उपलब्ध होते, मात्र फायनान्स मॅनेजमेंट ही एक कला असून, ही कला आत्मसात केली पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी कर्जत येथे व्याख्यानात दिला. कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र जोशी यांनी फायनान्स मॅनेजमेंट व्याख्यान आयोजित केले होते, त्यात चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
फायनान्स मॅनेजमेंट विषयी व्याख्यान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे फायनान्स मॅनेजमेंट व्याख्यान आयोजित केले होते. खोपोली, नेरळ तसेच बदलापूर येथून दर्दी जाणकार या व्याख्यानासाठी उपस्थित होती. त्यावेळी कर्जत नगरपरिषद नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि आयोजक भालचंद्र जोशी आदी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना चंद्रशेखर टिळक यांनी बोलताना कर्जत सारख्या लहानशा गावात एवढी मोठी उपस्थिती पाहून समाज जागरूक झाला आहे. आता आर्थिक गणिते सर्वांचा जुळविण्यात सर्व लोकांचा वेळ जात असतो. त्यात देखील तांत्रिक बाबी समजून घेतल्या तर सध्याच्या काटकसरीचे युगात आर्थिक गणिते जुळविणे सोपे जाईल असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी केले.
शेअर बाजार, भारताचे आर्थिक धोरण, लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट इत्यादी अनेक विषयांवर चंद्रशेखरजी टिळक यांनी खुमासदार शैलीत विश्लेषण केले. सध्या सोशल मिडियाचा जमाना असताना तुमची उपस्थिती महत्वाची आहे हे आयोजकांच्या नियोजनाचा यशस्वीतेचा वाटा राहणार असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे निमित्ताने पंकज भट आणि विहंग परब यांनी फायनान्स मॅनेजमेंट व्याख्यान आयोजित करण्यात विशेष सहकार्य केले.