दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील बोरिवली येथील जंगलात चारा खाण्यासाठी गेलेल्या म्हशींना विजेच्या तारांचा धक्का लागला. त्या विजेच्या धक्क्यात एका म्हशीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली येथे विजेची वाहिनी खाली लोंबकळत होती. सकाळच्या वेळी चारा खाण्यासाठी जंगल भागात जात असलेल्या म्हशींना विजेच्या वाहिनीचा धक्का बसला. त्या धक्क्यात त्यातील अनेक म्हशी पैकी दोन म्हशी तडफडू लागल्या. मात्र, त्यातील एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत मृत झालेली म्हैस ही दुभती असल्याने तिच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरण कंपनी कडून या मृत म्हशीच्या मृत्य बद्दल नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रस्ताव करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.

Exit mobile version