| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील खडसांबले गावचा तरुण मंदार अशोक चोरगे याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ठाण्यातील विटावा येथील हळदी समारंभासाठी उभारलेल्या मंडपाच्या लोखंडी पोलचा शॉक लागून रविवारी रात्री त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हळदी समारंभासाठी आलेल्या 25 महिलांचा जीव वाचवण्यासाठी त्याने हे संकट स्वतःवर ओढवून घेतले. हळदी समारंभासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात शॉर्टसर्किट झाल्यामुळे मंडपाच्या लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला. या पोलला मंदारचा स्पर्श होताच जोरदार झटका बसून तो बेशुद्ध अवस्थेत पडला. त्याला तातडीने उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली होती.
या घटनेने चोरगे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचे दशक्रियाविधी मंगळवार 5 डिसेंबर रोजी खडसांबले येथे तर उत्तरकार्य गुरुवार 7 डिसेंबर रोजी खडसांबळे येथे करण्यात येणार आहे. नांदगाव पंचक्रोशीच्या वतीने त्यांला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.