। पनवेल । प्रतिनिधी ।
दास्तान फाटा परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकाचा शोध उरण पोलीस करीत आहेत. या अनोळखी मृत इसमाचे वय अंदाजे 35 वर्ष, अंगाने सडपातळ, उंची साधारण 5 फूट 3 इंच, रंग सावळा, चेहरा उभट, डोक्यास पाठीमागून जखम, केस काळे-पांढरे, दाढी मिशी काहीशी पांढरी व वाढलेली, अंगात निळ्या रंगाची जीन्स व निळ्या रंगाचा फुल शर्ट त्यावर पांढरे रंगाचे पट्टे, कमरेला हिरव्या रंगाचा कापडी पट्टा आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उरण पोलीस ठाणे किंवा सहा.पोलीस निरीक्षक स्वप्नील केदार यांच्याशी संपर्क साधावा.
दास्तान फाटा परिसरात आढळला अनोळखी मृतदेह
