अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खोपोली रोड, काजुचा माळ,तळवली गावच्या जवळ रोड लागत एक मयत पुरुष वय अंदाजे 25-30वर्ष वयाचा मिळून आला आहे. 3 दिवसापूर्वीचा मृतदेह असण्याची शक्यता आहे, अंगावर अंडरवेयर सोडता कोणताही कपडा नाही. सदर मृतदेहाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे दात मोठ्या आकारचे खेबडे, डाव्या हातांच्या करंगली शेजारच्या बोटाला बँडेज केलेले आहे.
कोणी ओळखल्यास अथवा हरवला असल्यास 9423884745 या मोबाईल नंबर वर संपर्क करावा असे आवाहन रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी केले आहे.