अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।

रोडपाली सिग्नलवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. किशनमोहन सुबोध झा (31) हा शुक्रवारी (दि.19) दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करत होता. तो रोडपाली सिग्नल पनवेल मुंब्रा वाहिनीवर रोडपाली येथे आला असता अज्ञात वाहनचालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात किशनमोहन गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version