गारपोली येथे शाळेचे केंद्रीय मंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील गारपोली येथे कार्यरत असलेल्या रामदास आठवले फाऊंडेशन च्या माध्यमातून लिटिल फ्लॉवर्स स्कूल सुरू करण्यात येत आहे.या शाळेचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते करण्यात आले.
गारपोली येथील पोद्दार समृध्दी कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेले डॉ सुशील महाडिक हे रामदास आठवले फाऊंडेशन चालवतात.कर्जत तालुक्यातील गारपोली येथे डॉ महाडिक यांच्या माध्यमातून रामदास आठवले फाऊंडेशनने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्या लिटिल फ्लॉवर्स स्कुलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते करण्यात आले
.पोद्दार समृध्दी कॉम्प्लेक्स मध्ये सुरू केलेल्या या शाळेचे उद्घाटन प्रसंगी आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे,कोकण प्रदेश संघटक मारुती गायकवाड, साहित्यिक लक्ष्मण अभंगे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी संघटना जिल्हा अध्यक्ष ड उत्तम गायकवाड, आरपीआय कर्जत तालुका कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड,रायगड भूषण किशोर गायकवाड,तसेच धनंजय वाघमारे,सुमित सुर्वे आदी उपस्थित होते. सुरुवातीला प्ले ग्रुप ते केजी पर्यंत ही शाळा असणार असून सदर शाळा पोद्दार सोसायटी मध्ये चालविण्यात येणार आहे.यावेळी रामदास आठवले फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ सुशील महाडिक यांच्यासह कार्याध्यक्ष अमरचंद हाडोलीकर, सचिव ड यशपाल ओव्होळ, उपाध्यक्ष सचिन बनसोडे,खजिनदार संजय जैसबास तसेच प्रीतम कांबळे, शहास सुर्यवंशी, निलेश मुकादम, आदी उपस्थित होते.

Exit mobile version