। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलमध्ये झोपेत ब्रिजच्या पिल्लरच्या कठड्यावरून पडून एक इसम जखमी झालेल्या अवस्थेत पनवेल शहर पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला रुग्णवाहिकेने उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मृताच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
मृत इसमाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष, रंग गोरा, उंची अंदाजे 5 फुट 5 इंच, चेहरा उमट अंगाने मध्यम, डोक्याचे केस काळे, दाढी मिशीचे केस काळे वाढलेले, अंगात नेसुन फुलाची बारीक डिझाईन असलेला हाफ बाहयाचा शर्ट व काळसर रंगाची फुल पॅन्ट अशा वर्णनाचा आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस किंवा पोलीस उपनिरीक्षक राहुल डोळस यांच्याशी संपर्क साधावा.







