वाहनाच्या धडकेत तृतीयपंथीचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तृतीयपंथीचा मृत्यू झाल्याची घटना रोडपाली येथे घडली आहे. पनवेल-मुंब्रा रोडवर रोडपाली सिग्नल येथे एका अज्ञात वाहनाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून एका अज्ञात तृतीयपंथीला धडक दिली. त्यात तृतीयपंथीला गंभीर जखमा होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या अज्ञात वाहन चालकाविरोधाात कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी हा तृतीयपंथीचा रंग सावळा, अंगाने सडपातळ, केस काळे मध्यम, चेहरा उभट, नाक सरळ, उंची अंदाजे 5 फुट 7 इंच असून, नाकात कील, अंगात नेसून लाल रंगाची साडी, हिरव्या रंगाचा ब्लाऊज, पिवळ्या रंगाच परकर घातलेला आहे. या तृतीयपंथीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक एन.एस.शिरसकर (9594939780) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version