। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे जुन्या महामार्गांवर आसरेवाडीजवळ एका रिक्षाला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षाने समोरील चालणार्या जैन साधूच्या टीमला जोरदार धडक दिल्याने त्यातील एका तरुणाला जोरदार दुखापत होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून रिक्षा चालक महेंद्र शंकर कदम हा आपली रिक्षा मुंबईकडे घेऊन जात असताना तो खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसरेवाडी जवळ आला असता रिक्षाला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षाने रस्त्याच्या बाजूने चालणार्या जैन साधूना जोरदार धडक दिली. जैन साधूसोबत चालणारे विनोद जैन या तरुणाला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.






