उरणमध्ये मळीची विनापरवाना वाहतूक

। उरण । वार्ताहर ।
विनापरवाना मळीची अवैध वाहतूक करणारे सहा टँकर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने जप्त करुन सात जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल कोट्यवधी रुपयांच्या किंमतीचा आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 6 ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईमध्ये उरण तालुक्यातील भेंडखळ येथील कोनेक्स टर्मिनल प्रा. लि. कंपनीच्या गेटच्या बाहेरील बाजूस असणार्‍या रस्त्याच्या बाजूला, विनापरवाना मळीची अवैध वाहतूक करणारे चार टँकर तसेच कोनेक्स टर्मिनल प्रा. लि. कंपनीच्या गेटच्याा आतील बाजूस मळीने भरलेले दोन टँकर व मळीसाठा काढण्याकरिता वापरण्यात आलेला 5 एच.पी.चा मोठा थ्री फेज इंडक्शन मोटर पंप जप्त करण्यात आले. या प्रकरणी एकूण सात आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून एकूण 1 कोटी 09 लाख 86 हजार 795 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अवनीशकुमार भूमिकाप्रसाद पाली, नवलकुमार दिलीप निरााला, राजीतराम कालिकाप्रसाद गोड, राहूल अर्ध्वय, विश्राम रंगलाल मीना, जगदीश प्रसाद छुटन लाल मोना, राजेशसिंग दिवानसिंग ठाकूर यांचा समावेश आहे.

Exit mobile version