गीर गायींची टेम्पोतून विनापरवाना वाहतूक

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। माणगाव । प्रतिनिधी ।

दत्तनगर येथे गीर गायींची वाहतूक करणारे टेम्पो पोलिसांनी जप्त केले आहेत. या गायी मंडणगड येथील गोशाळेत घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले, पण अशा गोशाळा अस्तित्वातच नसल्याने तस्करीचा प्रकार उघडकीस आला. दत्तनगर येथे बुधवार (दि. 24) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पाच छोट्या टेम्पोतून 20 गीर गायींची विनापरवाना वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही वाहने ताब्यात घेत शेखर कासारेसह पाच टेम्पो चालकांविरोधात विनापरवाना वाहतुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मंडणगड येथील गोशाळेत या गायी नेण्यात येत असल्याचा बनाव करण्यात आला होता, अशी माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी दिली आहे.

Exit mobile version