| मुंबई | प्रतिनिधी |
कागदपत्रांमधील त्रुटीमुळे अपात्र ठरलेल्या गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसदारांना अल्प किमतीत हक्काचे घर मिळणार आहे. या कामगारांना आता आपल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता 31 डिसेंबरपर्यंत म्हाडाकडे करता येणार आहे. कामगार आयुक्तांनी त्याबाबत म्हाडाला निर्देश दिले असून त्याचा थेट फायदा 7 हजारांहून अधिक कामगारांना होऊ शकणार आहे.
गिरणी कामगारांना अल्प किमतीत हक्काचे घर देण्याची योजना राज्य सरकारने 2000मध्ये जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरातील 58 बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीत यशस्वी न झालेल्या सुमारे दीड लाख गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’ने अभियान सुरू केले होते. त्यानुसार 1 लाख 8 हजार 550 अर्जदारांनी अर्ज केले असून त्यातील जवळपास 99 हजार 937 अर्जदार पात्र ठरले आहेत.कागदपत्रांमधील त्रुटींमुळे जवळपास 7 हजार कामगार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे संबंधित कामगारांना आवश्यक कागदपत्रे जोडून देण्यासाठी मुदतवाढ यावीत म्हणून कामगार आयुक्तांकडे गिरणी कामगार संघटनांनी केली होती. त्यानुसार 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे वेळेत कागदपत्रे न मिळाल्याने सादर करण्यास विलंब झाला होता, त्यांना दिलासा मिळणार आहे.
अपात्र गिरणी कामगारांना मिळणार घर

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606