शेलू येथील मृतदेहाचा उलगडा

पत्नी-प्रियकर तसेच मित्राकडून
डोंबिवलीच्या तरुणाचा खून
नेरळ | प्रतिनिधी |
कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील शेलू गावाजवळ रस्त्यालगत काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.त्या अज्ञात मृतदेहाचा शोध नेरळ पोलिसांनी घेतला असून सदर मृतदेह डोंबिवली येथील विवाहित तरुणाचा असून त्याचा खून करून मृतदेह रायगड जिल्हा हद्दीत टाकून दिला होता.दरम्यान,नेरळ पोलिसांनी त्या तरुणाचा खून करणार्‍या त्याची पत्नी,पत्नीचा प्रियकर आणि मित्र अशा तिघांना अटक केली आहे.

रविवार 20 जून रोजी नेरळ पोलिसांना कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील शेलू गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.नेरळ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन बेपत्ता व्यक्तीची माहिती गोळा केली असता डोंबिवली येथील एक तरुण बेपत्ता असल्याची तक्रार डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती मिळाली होती. प्रवीण धनराज पाटील या नावाच्या व्यक्तीची हरवल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी नोंदवली असल्याने या घटनेचा तपास ठाणे पोलिसांच्या कल्याण गुन्हे शाखेचे पथक करत होते.नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गिरीश भालचिम यांनी कल्याण गुन्हे शाखेशी संपर्क साधून माहिती दिली असता हरवलेल्या व्यक्ती ही शेलू येथे सापडलेला मृतदेह यांच्यात साम्य असल्याचे असल्याचे समोर आले होते.त्या व्यक्तीचा तपास करणार्‍या कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने नेरळ येथे येऊन तपासाला गती दिली.पोलीस पथकाने प्रवीण पाटीलची पत्नी लक्ष्मी आणि तिच्या नातेवाईक यांचे कॉल रेकॉर्ड तपासले असता पत्नी लक्ष्मी ही 20 वर्षीय अरविंद उर्फ मेरी रवींद्र राम आणि 19 वर्षांय सन्नीकुमार रामानंद सागर यांच्याशी सतत संपर्कात असल्याचे समोर आले होते.

त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता अरविंद आणि लक्ष्मी यांचे अनैतिक संबंध होते आणि घरात पती प्रवीण सोबत सारखी चिडचिड सुरू तिघांनी प्रवीण ला संपवायचा प्लॅन आखला होता.अरविंद,सनी आणि लक्ष्मी या तिघांनी प्रवीण धनराज पाटील वर लोखंडी रॉडच्या साहाय्याने हल्ला करून आणि नंतर गळा दाबून हत्या केली होती.प्रवीण ठार झाला असल्याची खात्री झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह प्लास्टिकच्या चटईत गुंडाळून ऑटो रिक्षाच्या साह्याने हे तिघे जण रायगड जिल्ह्यातील हद्दीत घुसून शेलू गावा शेजारी नाल्यात मृतदेह फेकून दिला आणि ते पुन्हा डोंबिवली येथे परत गेले होते. कल्याण गुन्हे शाखेने लक्ष्मी प्रवीण पाटील,अरविंद उर्फ मेरी रविंद राम आणि सान्निकुमार सागर या तिघांना खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्या तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन हे अधिक तपास करीत असून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने नेरळ पोलिसांचे गुन्ह्यातील तपासकामी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहे.

Exit mobile version