विदर्भात अवकाळी

| नागपूर | वृत्तसंस्था |

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात गापटीने तडाखा दिला आहे. विदर्भातील अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता स्कायमेट या खासगी संस्थेनं वर्तवली आहे. देशात यंदा सरासरीच्या 102 टक्के सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.

Exit mobile version