| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हैराण करुन सोडणाऱ्या अवकाळी पावसाने आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत धडक दिली आहे. हा पाऊस मुंबईत धडकण्याआधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शरहांमध्ये बरसला. त्यानंतर तो पुढे मुंबईत येऊन धडकला आहे.
अवकाळी पावसाने राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला आहे. 40 ते 50 किमी प्रतीतास अशा वेगाने वाहणारे वारे वाहत आहेत. तसेच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह धुमाकूळ घातला आहे. प्रचंड वारा आणि पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हा पाऊस इतक्या वेगाने आला की त्याने अवध्या अर्ध्या तासात मुंबईसह, पालघर आणि नवी मुंबईच्या परिसराला व्यापून टाकले आहे. मुंबईत तर चांगलाच पाऊस पडला. राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.