चिर्ले येथे छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आर्यन इन्टरप्रायजेसच्या माध्यमातून शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा सुधाकर पाटील व मिनाक्षी सुधाकर पाटील, समिर पाटील यांच्या हस्ते विधिपूर्वक पूजा करून पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून उरण शहरात छत्रपती युवा संघाच्या माध्यमातून भव्य दिव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शाळेतील विद्यार्थी परिसरातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाबरोबर प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने परिसर दुमदुमून गेला होता.

श्री महागणपती तीन आसनी ऑटो रिक्षा चालक मालक संस्था चिरनेरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.तसेच चिरनेर ते कोप्रोली, दिघाटी येथे मोफत रिक्षा मधून प्रवाशांसाठी मोफत प्रवासाचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version